मुंबईत नेव्ही भरतीतला घोटाळा उघड

September 26, 2010 2:08 PM0 commentsViews: 26

26 सप्टेंबर

मुंबईत सीबीआयने नेव्ही भरतीतला घोटाळा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. नेव्हीतल्या 175 क्लार्कच्या जागांसाठी आज भरती परीक्षा आयोजित केली होती.

त्यासाठी देशभरातून 35 हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. पण या परीक्षेतील प्रश्नपत्रिका नौदलातल्या दोन अधिकार्‍यांनी आधीच फोडल्या होत्या.

या दोन अधिकार्‍यांना आणि एक माजी नौदल अधिकार्‍याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासोबत एका मध्यस्थालाही अटक करण्यात आली आहे.

या प्रश्नपत्रिका ते 15 ते 50 हजार रुपयांना विकत होते. या प्रश्नपत्रिका विकत असतानाच सीबीआयने रंगेहात त्यांना पकडले. या चौघांनी सुरू केलेल्या मानसा इंटरनॅशनल या एजन्सीमार्फत ते हा गैरव्यवहार करत होते.

close