दसरा मेळाव्यास परवानगी नाही

September 27, 2010 12:11 PM0 commentsViews: 1

27 सप्टेंबर

शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

दिवसा 50 डेसिबल्सपेक्षा आणि रात्री 45 डेसिबल्सपेक्षा जास्त आवाज करण्यास शिवाजी पार्कवर कायद्यानेच बंदी आणण्यात आली आहे.

त्यामुळे पोलिसांनी सेनेच्या दसर्‍या मेळाव्याला परवानगी नाकारली आहे.

स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनाशिवाय आता शिवाजी पार्कवर इतर समारंभांना परवानगी देण्यात येत नाही.

मात्र सेनेच्या दरवर्षी होणार्‍या कार्यक्रमाला परवानगी का नाही, असे विचारत शिवसेनेने कुठल्याही परिस्थितीत मेळावा घेणारच अशी भूमिका घेतली आहे.

close