शाळा फी वाढीविरोधात खारघरमध्ये आंदोलन

September 27, 2010 12:22 PM0 commentsViews: 2

27 सप्टेंबर

खारघरमध्ये खाजगी शाळांच्या फी वाढीविरोधात पालकांनी आज शाळा बंद आंदोलन केले.

यावर कारवाई करताना पोलिसांनी 25 पालकांसह पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना ताब्यात घेतले.

गेल्या अनेक दिवसांपसून शाळा फी वाढ करत आहेत. पालकांनी अनेकदा तक्रार करुनही शाळेचे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

अखेर पालकांनी आज आंदोलन तीव्र केले.

खारघरमध्ये 18 शाळा विनाअनुदानित आहेत. त्यात 25 हजार विद्यार्थी शिकत आहेत. या सगळ्यांचे पालक या आंदोलनात उतरले.

यात 44 आंदोलकांना अटक करण्यात आली. त्यात 16 महिलांचा समावेश आहे.

या सगळ्यांची दुपारी जामिनावर सुटका करण्यात आली. तर दुसरीकडे शाळा प्रशासन अजूनही यावर बोलायला तयार नाही.

close