महागाई विरोधात भाजप रस्त्यावर

September 27, 2010 12:29 PM0 commentsViews: 125

27 सप्टेंबर

महागाईच्या विरोधात महिला भाजपने आज राज्यभर आंदोलन छेडले. मुंबईत खेरवाडी नाक्यापासून बांद्रा येथील जिल्हाधिकारी ऑफिसवर महिलांनी मोर्चा काढला.

सरकारच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यात सुमारे 20 महिलांना ताब्यात घेण्यात आले. मुंबईतील या मोर्चाचे नेतृत्व भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष स्मृती इराणी यांनी केले.

close