कोल्हापुरातील जागावाटप निश्तित

September 27, 2010 12:43 PM0 commentsViews: 4

27 सप्टेंबर

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील आघाडी आणि जागा वाटपाचा घोळ संपला आहे. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष चांगल्या आणि सक्षम उमेदवारांच्या चाचपणीत आहेत.

या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये युती झाली आहे. शिवसेनेला 50 जागा तर भाजपला 23 जागा नक्की झाल्या आहेत.

चार प्रभागात तोडगा न निघाल्याने तिथे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे काँग्रेस पक्ष सर्वच्या सर्व 77 जागा लढवणार आहे.

राष्ट्रवादीने जनसुराज्य पक्षासोबत युती केली आहे. त्यात राष्ट्रवादी 47 आणि जनसुराज्य पक्ष 30 जागांवर लढणार आहे.

close