‘ सामना ‘ च्या अग्रलेखात साध्वी प्रज्ञासिंगचं समर्थन

October 28, 2008 8:51 AM0 commentsViews: 24

28 ऑक्टोबर, मुंबईशिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ' सामना ' च्या अग्रलेखात मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंग हिचं समर्थन करण्यात आलं आहे. ' हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना बॉम्बस्फोट प्रकरणात गोवून सरकार मुसलमान समाजाची वाहवा मिळवतंय आणि देशाचं नुकसान करतंय ', अशी टीका त्यात करण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञासिंग आणि तिच्या दोन सहकार्‍यांना एटीएसनं ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पुण्यातील दोन लष्करी अधिकार्‍यांना अटक करुन त्याला राष्ट्रीय कटाचं स्वरुप देण्याचा प्रयत्न एटीएसवाल्यांनी चालवला आहे, असा आरोप अग्रलेखात करण्यात आला आहे.धर्मासाठी बलिदान देणारा कडवट हिंदू लादेन उभा राहावा, एवढं हिंदूंचं भाग्य नसल्याचं त्यात म्हटलं आहे.

close