कल्याण डोंबिवलीसाठी मनसे सरसावली

September 27, 2010 12:49 PM0 commentsViews: 2

27 सप्टेंबर

कल्याण डोंबिवली निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता मनसेनेदेखील उमेदवारी प्रक्रिया सुरु केली आहे. याबाबतची पहिली बैठक राज ठाकरे यांनी राजगड इथे घेतली.

या बैठकीला स्थानिक आमदार प्रकाश भोईर, रमेश पाटील तसेच बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अनिल शिदोरे आदी मनसेचे नेते हजर होते.

या बैठकीत राज ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांशी चर्चा करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला

close