हर्सुल जेलमध्ये कैद्यांचा छळ

September 27, 2010 1:03 PM0 commentsViews: 3

27 सप्टेंबर

औरंगाबादच्या हर्सुल जेलमध्ये अधिकार्‍यांकडूनच कैद्यांचा छळ होत असल्याचे उघडकीस आले आहे.

हर्सुल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या मुक्ताराम शिंदे या कैद्याने छळाची हकीगत शर्टवर लिहून बाहेर पाठवली आहे.

गेल्या काही वर्षांपासून या अन्यायाविरुद्ध कोर्टाकडे तक्रार मागणार्‍या मुक्ताराम शिंदेचा जेलच्या अधिकार्‍यांनी छळ सुरू ठेवला आहे.

12 वर्षांपासून विविध जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या मुक्तारामने जेलमध्ये कैद्यांना काय त्रास दिला जातो हे गुपचूप आपल्या शर्टवर लिहिले.

'लोकमत'चे क्राईम रिपोर्टर विनोद काकडे यांना हा शर्ट मिळाला.

close