एसटीची ‘शीतल सेवा’

September 27, 2010 1:09 PM0 commentsViews: 2

27 सप्टेंबर

एसटी महामंडळाने आजपासून दादर-पुणे अशी वातानुकुलीत सेमी लक्झरी 'शीतल बससेवा' सुरू केली आहे. या प्रवासासाठी प्रत्येकी 180 रुपये प्रवास भाडे असणार आहे.

अशा प्रकारची देशातील ही पहिली बस सेवा असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.

मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयात आज परिवहन मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या हस्ते या 'शीतल बस'चे उद्घाटन करण्यात आले.

सध्या दादर-पुणे असलेली ही बस सेवा पुढे इतरही मार्गांसाठी सुरू करणार असल्याचे परिवहन मंत्रालयाने सांगितले.

close