औरंगाबादमध्ये बस कर्मचार्‍यांचा चक्का जाम

September 27, 2010 2:13 PM0 commentsViews: 1

27 सप्टेंबर

औरंगाबादमध्ये शहर बस वाहतूक करणार्‍या 240 कर्मचार्‍यांना मागील चार महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याने त्यांनी चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे.

त्यांनी सर्व बसेस जिल्हा परिषद मैदान आणि सेंट्रल नाक येथे उभ्या केल्या आहेत. त्यामुळे शहरातील बस सेवा पूर्णपणे बंद झाली आहे.

वारंवार आंदोलन करुनही महानगर पालिका आणि अकोल प्रवासी वाहतूक संस्थेच्या कंत्राटदाराने या कर्मचार्‍यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

आज महानगरपालिकेत बस वाहतूक कंत्राटदारासोबत बैठक घेण्यात आली. यात कंत्राटदाराने बस सेवा बंद करण्याची नोटीस दिली.

त्यातचे महानगरपालिकेने बस सेवा एसटी महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याची तयारी चालवली आहे.

एसटी महामंडळाने या कर्मचार्‍यांना सामावून घेण्याची शाश्वती दिली नाही.

त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचार्‍यांनी चक्का जाम आंदोनल सुरू केले आहे.