‘स्वरबंध’चे पुरस्कार जाहीर

September 27, 2010 2:26 PM0 commentsViews: 1

27 सप्टेंबर

गेल्या 2 वर्षांपासून कार्यरत असलेल्या 'स्वरबंध' या संस्थेने या वर्षीही सहवादक पुरस्कार दिले.

यावर्षी लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे पुत्र विजय चव्हाण यांना तालवाद्यासाठी तर संगीतकार बाळ पार्टे यांचे चिरंजीव तुषार पार्टे यांना गिटार वादनासाठी पुरस्कार देण्यात आले.

यावेळी 'राग रंग गीत बंध' हा मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी सुलोचना चव्हाण, अशोक पत्की, उल्हास बापट, शंकर अभ्यंकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

close