फी वाढीविरोधात दोन दिवस शाळा बंद

September 27, 2010 2:41 PM0 commentsViews: 2

27 सप्टेंबर

नवी मुंबईतल्या खारघरमध्ये खाजगी शाळांच्या फी वाढी विरोधात पालकांनी शाळा बंद आंदोलन केले आहे.

आज आणि उद्या दोन दिवस शाळा बंद केल्या राहणार आहेत. आज आंदोलन करणार्‍या काही पालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून शाळा फी वाढ करत आहेत. पालकांनी अनेकदा तक्रार करुनही शाळेचे प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. अखेर पालकांनी आज आपले आंदोलन तीव्र केले.

खारघरमध्ये 18 शाळा विनाअनुदानित शाळा आहेत. त्यात 25 हजार विद्यार्थी शिकत आहेत. या सगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक या आंदोलनात उतरले आहेत.

close