महम्मद आमीरचा सलमान बट्टवर आरोप

September 27, 2010 3:20 PM0 commentsViews: 1

27 सप्टेंबर

स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी आणि पाकिस्तानचा युवा फास्ट बॉलर महम्मद आमीरने खळबळजनक कबुली दिली आहे. टीमचा कॅप्टन सलमान बट्टनेच आपल्याला फिक्सिंगमध्ये ओढले, अशी माहिती आमीरने पाक क्रिकेट बोर्डाला दिली आहे.

पीटीआयने ही बातमी दिली आहे. आणि पाक बोर्डातील विश्वसनीय सूत्रांकडून ही बातमी मिळाल्याचे पीटीआयच्या बातमीत म्हटले आहे. पाक बोर्डाचे अध्यक्ष इजाझ बट यांना लिहिलेल्या पत्रात आमीरने बट्ट बरोबर महम्मद आसिफचेही नाव घेतले आहे.

आपल्याला स्पॉट फिक्सिंगशी काही घेणे-देणे नव्हते. पण या दोघांनी आपल्याला या प्रकारात ओढले, असे त्याने म्हटले आहे.

आमीर सध्या पाकिस्तानात आहे. आणि इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याच्या आरोपावरुन आयसीसीने त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली आहे.

close