रमाबाई प्रकरणातील गुन्हे मागे

September 27, 2010 4:43 PM0 commentsViews: 2

27 सप्टेंबर

मुंबईतील रमाबाई नगर येथील पुतळा विटंबनाप्रकरणी काही आरपीआय कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्त्यांवरच पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. मात्र आज दोन गुन्ह्यांतून सर्व आरोपींची कोर्टाने मुक्तता केली आहे.

या व्यक्तींवर दंगल भडकावणे, जाळपोळ करणे, पोलीस चौकी जाळणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, असे आरोप होते. या घटनेबाबत चार गुन्हे दाखल आहेत.

एक गुन्हा जखमी व्यक्तींवर, एक गुन्हा मनोहर कदम याच्यावर तर तिसरा गुन्हा घटनेच्या वेळच्या परिस्थितीवर आणि चौथा गुन्हा घटनेनंतर उद्भवलेल्या परिस्थिती बाबत होता.

तिसर्‍या आणि चौथ्या गुन्ह्यात येथील आरपीआयचे पदाधिकारी असलेले सुमारे 27 जण आरोपी होते.आरपीआयच्या या कार्यकर्त्यांवरील हे गुन्हे 2005 सालात दाखल करण्यात आले होते.

27 पैकी चार आरोपींचे यापूर्वीच निधन झाले आहेत.

close