अयोध्या निकाल 30 सप्टेंबरला

September 28, 2010 9:26 AM0 commentsViews:

26 सप्टेंबर

अयोध्येच्या वादग्रस्त जमिनीचा निकाल येत्या 30 सप्टेंबरला लागणार आहे. निकाल पुढे ढकलण्याची रमेशचंद्र त्रिपाठी यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली.

आणि निकालाला दिलेली स्थगिती उठवली. त्यानंतर अलाहाबाद हायकोर्टाने 30 सप्टेंबर ही निकालाची तारीख निश्चित केली.

त्यापूर्वी सरन्यायाधीश सरोश कापडिया यांच्या नेतृत्वाखालच्या तीन सदस्यांच्या खंडपीठापुढे आज रमेशचंद्र त्रिपाठी यांच्या याचिकेवर सुनावणी झाली.

त्यावेळी निकालाची अनिश्चितता संपवा, अशी भूमिका केंद्र सरकारच्या बाजूने ऍटर्नी जनरलनी मांडली. सर्वांचा युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने एकमताने त्रिपाठी यांची याचिका फेटाळली.

पण याचिका फेटाळताना कोर्टाने कोणतीही कारण मात्र दिले नाही. आता न्यायमूर्ती अगरवाल, न्यायमूर्ती डी. व्ही. शर्मा आणि न्यायमूर्ती खान या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे हा निकाल लागणार आहे.

पण न्यायमूर्ती शर्मा येत्या 1 ऑक्टोबरला रिटायर होणार आहेत. त्यामुळेच त्यापूर्वी म्हणजे 30 सप्टेंबरला निकालाची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

close