लता मंगेशकरांचा 81वा वाढदिवस

September 28, 2010 10:50 AM0 commentsViews: 4

28 सप्टेंबर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 81 वा वाढदिवस. दीदींचा आतापर्यंतचा सगळा संगीत प्रवास थक्क करणारा आहे.

पहिली मंगळागौर आणि 'आपकी सेवा में' पासूनची ही सुरांची जादू आजही रसिकांना मोहून टाकते.

संगीतकार एस. डी. बर्मन असो, रोशन असो की मदनमोहन, लतादीदींच्या मधूर सुरांनी प्रत्येक गाण्याचे सोने केले.

दीदींच्या सुरेल स्वरांची जादू आजही कायम आहे. या स्वरसाम्राज्ञीला 'आयबीएन-लोकमत'कडून वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.

close