चेस वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दहाव्या मॅचमध्ये विश्वनाथन आनंदचा पराभव

October 28, 2008 10:28 AM0 commentsViews: 7

भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला चेस वर्ल्ड चॅम्पियन शिपच्या दहाव्या मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला. ब्लादिमीर क्रामनिक बरोबर झालेला दहाव्या मॅचमध्ये आनंद काळ्या सोंगट्यांसह खेळत होता. वर्ल्ड चेस चॅम्पियन होण्यासाठी आनंदला ही दहवी मॅच ड्रॉ करणे पुरेशी ठरणारी होती. पण या मॅचमध्ये त्याला पराभव पत्कारवा लागला. वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये आणखी दोन मॅच बाकी आहेत. आणि आनंदच्या खात्यात आता सहा पॉइंट्स जमा आहेत. त्याचा प्रतिस्पर्धी क्रामनिककडे आहेत चार पॉइंट्स. आनंद आणि क्रामनिक यांच्यात वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी बारा मॅच होणार आहेत. आतापर्यंत झालेल्या दहा मॅचपैकी तीन आनंदने जिंकल्यात तर इतर सहा मॅच ड्रॉ झाल्यात. सर्वात आधी साडेसहा पॉइंट्स मिळवणारा खेळाडू वर्ल्ड ठरेल.

close