कॉमनवेल्थच्या तयारीला तीन दिवसांची मुदतवाढ

September 28, 2010 10:57 AM0 commentsViews: 3

28 सप्टेंबर

कॉमनवेल्थ गेम्सच्या तयारीला आणखीन तिन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी ही घोषणा केली.

कॉमनवेल्थ गेम्सला आता फक्त 5 दिवसच उरले आहेत. कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमधील अस्वच्छतेवर या अगोदर अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यामुळे साफसफाईसाठी तसेच अपूर्ण बांधकामांसाठीची मुदत आणखीन तीन दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्यासाठी अतिरिक्त कामगारांची नेमणूक करण्यात आल्याचेही शिला दीक्षित यांनी सांगितले.

तसेच नेहरु स्टेडियमच्या बाहेर कोसळलेल्या फुटओव्हर ब्रिजच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले. दरम्यान कॉमनवेल्थ गेम्सच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

close