प्रिन्स चार्ल्स आणि राष्ट्रपतींच्या हस्ते उदघाटन

September 28, 2010 11:06 AM0 commentsViews: 5

28 सप्टेंबर

कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनातील गोंधळातील वाद कमी होता की काय, म्हणून आता गेम्सचे उद्घाटन कोण करणार यावरुन वाद रंगला होता. पण ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स आणि राष्ट्रपती प्रतिभा पाटील या दोघांच्या हस्ते एकत्रितपणे हे उद्घाटन आता होणार आहे.

त्यामुळे सध्या तरी हा वाद मिटला आहे. यापूर्वी गेम्सचे उद्घाटन कोण करणार, यावरून राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे कार्यालय आणि प्रिन्स चार्ल्सच्या इंग्लंडमधील ऑफिसदरम्यानच मतभेद निर्माण झाले होते.

गेम्सचे उद्घाटन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते करण्यात यावे, असे भारतीय पदाधिकार्‍यांचे मत होते. पण परंपरेनुसार इंग्लंडच्या राजघराण्याचा प्रमुखच कॉमनवेल्थ गेम्सचे उद्घाटन करतो, असे चार्ल्सच्या कार्यालयातील अधिकार्‍यांचे म्हणणे होते.

यंदाच्या गेम्समध्ये राणी एलिझाबेथ हजर राहू शकणार नाहीत. त्यामुळे प्रिन्स चार्ल्स हे क्वीन्स बॅटनवरील संदेश वाचतील आणि स्पर्धा सुरु झाल्याची घोषणा राष्ट्रपती प्रतिभा पाटील करतील, असे आता ठरवण्यात आले आहे.

close