खारघरमध्ये शाळाबंद आंदोलन सुरू

September 28, 2010 11:27 AM0 commentsViews: 1

28 सप्टेंबर

नवी मुंबईतील खारघरमध्ये खाजगी शाळांच्या फी वाढी विरोधात पालकांनी शाळा बंद आंदोलन केले आहे.

आज येथील शाळा बंद केल्या गेल्या आहेत. आंदोलन करणार्‍या काही पालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

गेल्या अनेक दिवसांपासून शाळा फी वाढ करत आहेत. पालकांनी अनेकदा तक्रार करुनही शाळेचे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अखेर पालकांनी आज आंदोलन तीव्र केले.

खारघरमध्ये 18 शाळा विनाअनुदानित आहेत. त्यात 25 हजार विद्यार्थी शिकत आहेत. या सगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक या आंदोलनात उतरले आहेत.

close