संमेलनाध्यक्षपदाची मतमोजणी बुधवारी

September 28, 2010 11:29 AM0 commentsViews: 3

28 सप्टेंबर

ठाणे इथे होणार्‍या 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी सकाळी 9 वाजता मतमोजणी होत आहे.

या निवडणुकीत ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, समीक्षक चंद्रकुमार नलगे, ज्येष्ठ कथालेखिका गिरीजा कीर यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी 791 मतदार आहेत. त्यापैकी महामंडळाच्या संलग्न संस्थांकडे आतापर्यंत 411 मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत.

close