मामिची धूम 21पासून

September 28, 2010 11:39 AM0 commentsViews: 4

28 सप्टेंबर

सोमेन मिश्रा, मुंबई

मुंबई फिल्म फेस्टिव्हल आयोजित मामि म्हणजेच मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली. 21 ते 28 ऑक्टोबरपर्यंत जगभरातील सिनेमे या महोत्सवात दाखवले जातील.

मुंबई फिल्म फेस्टिव्हलचे यंदाचे हे बारावे वर्ष आहे. आणि हे वर्ष अधिक व्यापक स्वरुपात साजरे केले जात आहे. 58 देशांतील सुमारे 200 सिनेमांचा सहभाग या वर्षाच्या फेस्टिव्हलमध्ये असणार आहे.

डेव्हिड फिचरचा नवा सिनेमा द सोशल नेटवर्कने या फेस्टिव्हलचे उद्घाटन होईल. तर प्रसिद्ध फिल्ममेकर ऑलिव्हर स्टोन आणि जेन कॅम्पिअन यांचा पहिल्यांदाच सहभाग फेस्टिव्हलमध्ये असणार आहे.

45 जपानी सिनेमांच्या रेट्रोस्पेक्टीव्हज्‌सोबत या फेस्टिव्हलमध्ये बर्लिन, कान्स, व्हेनिस आणि लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमधील विजेते सिनेमेही दाखवले जातील.

ज्यात सोफिया कपोला यांच्या समव्हेअर, इनारितूंच्या ब्युटीफूल आणि अब्बास कियारोस्तामींच्या सर्टीफाईड कॉपी सारख्या सिनेमांचा सहभाग असेल.

याशिवाय ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

close