हिमायत बेगला न्यायालयीन कोठडी

September 28, 2010 3:01 PM0 commentsViews: 3

28 सप्टेंबर

पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेगला 4 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश आज कोर्टाने दिले.

हिमायत बेगची पोलीस कोठडी संपल्याने त्याला आज कोर्टात हजर करण्यात आले. बेगचे वकीलपत्र घेतल्याने त्याचे वकील अब्दुल रेहमान यांचा निषेध पुणे बार असोसिएशनने केला होता.

आज मात्र गांधीगिरी करत वकिलांनी गुलाबाची फुले देत दिलजमाई केली. तसेच या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून पुण्याच्याच वकिलाची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी बार असोसिएशनतर्फे करण्यात आली.

close