राज ठाकरे ठोकणार डोंबिवलीत तळ

September 29, 2010 9:24 AM0 commentsViews: 4

29 सप्टेंबर

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता डोंबिवलीत स्वत: मुक्काम करणार आहेत.

त्यासाठी स्थानिक आमदार रमेश पाटील आणि मुंबईचे आमदार नितीन सरदेसाई यांनी राज ठाकरे यांच्या मुक्कामासाठी जागा शोधायला सुरुवात केली आहे.

कल्याण आणि डोंबिवलीच्या मधोमध असणार्‍या रिजन्सी इस्टेटमध्ये जागा बघण्यासाठी हे दोघेही कार्यकर्ते दाखल झाले होते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मात देण्यासाठी कॉग्रेस आणि मनसेने आता रणनीती आखली आहे. त्यासाठी मनेसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत: राजकीय अखाड्यात उतरले आहेत.

close