तिसरी आघाडी लढवणार 77 जागा

September 29, 2010 10:21 AM0 commentsViews: 2

29 सप्टेंबर

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीत तिसर्‍या आघाडीने 77 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या तिसर्‍या आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यामध्ये आरपी आय 50, राष्ट्रीय समाज पक्ष 10, समाजवादी पार्टी 12 आणि शेकाप 5 जागा लढवणार आहे.

कोणत्या जागा कोण लढवणार यासंदर्भातील निर्णय 1 आक्टोबरला होणार्‍या बैठकीत घेतला जाणार आहे.

पाणी, झोपडपट्टया या मुख्य मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे.

close