दिल्लीत सुरक्षेचा आढावा

September 29, 2010 10:40 AM0 commentsViews:

29 सप्टेंबर

कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेच्या निमित्ताने आज दिल्लीत सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. स्पर्धेशी संबंधिक सर्व ठिकाणी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

कॉमनवेल्थची सर्व स्टेडियम्स आणि खेळाडूंची निवासस्थाने पोलिसांच्या देखरेखीखाली असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त वाय. एस. दडवाल यांनी म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी कॉमनवेल्थ गेम्सच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आज बैठक बोलावली होती. या बैठकीत दिल्लीतील सुरक्षाव्यवस्थेवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

स्पर्धेसाठी सुरक्षा दल आणि निमलष्करी दलाच्या जवानांची मदत घेण्यात आली असून एक लाखाहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

close