मुंबईत लक्ष्मीपूजनाचा उत्साह शिगेला

October 28, 2008 11:25 AM0 commentsViews: 6

28 ऑक्टोबर, मुंबई – अश्विनअमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन. त्यादिवशी घरातील दागदागिने किंवा रोख रक्कम देवापुढे ठेवून त्यांची पूजा केली जाते तर जिथं स्वच्छता असते तिथं लक्ष्मी वास करते, अशी समजूत असल्याने काही ठिकाणी केरसुणीचीही पूजा केली जाते. व्यापारी लोकांच्या हिशेबाचं नवीन वर्ष लक्ष्मीपूजनापासून सुरू होतं. या दिवशी मुंबई शेअर ब्रोकर्सकडे चोपडा पूजन करण्याची पद्धत आहे. पण काळानुसार त्यात काही बदलही झाले आहेत. शेअर बाजारात दिवसभरात कोट्यवधींचे व्यवहार होतात. त्याची नोंद ज्या पुस्तकात केली जाते, त्याला चोपडा पूजन म्हणतात. शारदा पूजन किंवा मुहूर्त पूजन असंही म्हटलं जातं. लक्ष्मीपूजनच्या दिवशी प्रत्येक ब्रोकर या चोपड्याची पूजा करतात. या दिवसांपासून ते नवीन पुस्तकात वर्षभराची नोंद करतात. यादिवशी चोपड्यावर ' शुभ ' आणि ' लाभ' असं लिहिण्याची पद्धत आहे. लक्ष्मी आणि गणपतीची यादिवशी पूजा केली जाते. काळानुसार यातही खूप बदल झालेत. एकावेळी मिळणा-या या चोपड्याचं रूप पालटलं आहे. पारंपारिक चोपड्याची जागा कॉम्प्युटरनं घेतली आहे.आज ब-याच छोट्या फायनान्शिअल फर्ममध्ये कॉम्प्युटरची मंत्रोच्चारात पूजा करुन नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते. ही पद्धत मुख्यत्वे:करून महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये साजरी केली जाते. काळ कितीही बदलला तरीही पूजेचं पारंपारिक स्वरुप मात्र अगदी संस्कृतीला साजेसं आहे.

close