शिवसैनिकांनी केला टोलनाका उध्वस्त

September 29, 2010 3:04 PM0 commentsViews: 4

29 सप्टेंबर

आज लातूर – नांदेड मार्गावरील धरणी टोल नाक्यावर शिवसैनिकांनी हिंसक आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी टोलनाक्याची तोडफोड करत तो पूर्णपणे उध्वस्त केला.

कहर म्हणजे आंदोलनकर्त्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या दोन पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेतल्या. तर पोलिसांनी घटनास्थळावरून पोबारा केला.

चाकूर पोलीसस्टेशनचे हेड कॉन्स्टेबल व्ही. व्ही. गायकवाड आणि टी. जे. कोकणे चाकूर यांच्या बंदुका आंदोलनकर्त्यांनी पळवल्या. घटनेनंतर या बंदुका आंदोलकांनी परत केल्या.

यापूर्वीही शिवसैनिकांनी या टोल नाक्याविरुध्द आंदोलन केले होते.

close