खेळाडूंची माघार सुरूच

September 29, 2010 3:14 PM0 commentsViews: 1

29 सप्टेंबर

दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्सला आता केवळ चार दिवसांचा अवधी उरला आहे. पण स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी माघार घेण्याचे सत्र सुरुच आहे.

माघार खेळाडूंच्या यादीत आता 800 मीटरची वर्ल्ड चॅम्पियन कास्टर सेमेन्याच्या नावाचाही समावेश झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या सेमेन्याने पाठीच्या दुखापतीमुळे कॉमनवेल्थमधून माघार घेतली आहे.

पण तिच्या कोचने तिला स्पर्धेसाठी फिटनेसचे प्रमाणपत्र दिल्यानंतरही सेमेन्याने स्पर्धेतून माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

close