अयोध्येसह देशभरात कडेकोट सुरक्षा

September 29, 2010 4:58 PM0 commentsViews: 3

29 सप्टेंबर

अयोध्येतील वादग्रस्त जमिनीचा निकाल उद्या अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्या आणि लखनौसह देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

निकालानंतर शांततेचे आवाहन केंद्र सरकार तसेच सर्व राजकीय पक्षांनी केले आहे.

उत्तर प्रदेशातील रस्त्यांवर 1 लाख 90 हजार जवान तैनात आहेत. अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल जिथे घोषित केला जाणार आहे, त्या अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाचा परिसर नो एन्ट्री झोन जाहीर करण्यात आला आहे.

पण लखनौमधील शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्याची गरज नसल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

close