सातार्‍याजवळ कुटुंबाचा होरपळून मृत्यू

September 29, 2010 5:52 PM0 commentsViews: 1

29 सप्टेंबर

इंडिगो गाडीने पेट घेतल्यामुळे एकाच कुटंुबातील तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना सातार्‍याजवळ, पुणे- बंगलोर महामार्गावर केसुर्डी फाट्याजवळ घडली.

हे तिघेही बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील रहिवाशी आहेत. अजय केंजळे, गौरी केंजळे आणि त्यांचा 6 वर्षाचा मुलगा आदित्य असा हा दुदैर्वी परिवार आहे.

तीनदा पलटी होऊन या गाडीने पेट घेतला. गाडी काही काळ तशीच पेटती राहिल्याने या रस्त्यावर चार ते पाच किलोमीटर रांग लागली होती.

close