ठाण्यात अवाढव्य कुर्ता

September 29, 2010 6:03 PM0 commentsViews: 4

29 सप्टेंबर

काही वर्षांपूर्वी ठाण्यात एक विक्रमी शर्ट तयार करण्यात आला होता. आणि आता तयार झालाय एक अवाढव्य कुर्ता. या कुर्त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

ठाण्यात मनिषा ओगले या महिलेने 40 बाय 20 फुटांचा हा अजस्र कुर्ता तयार केला आहे. हा कुर्ता तयार करण्यासाठी 180 मीटर कापडाचा वापर करण्यात आला.

11 लीटर रंग वापरुन 29 तास 22 मिनिटे एवढ्या वेळात हा कुर्ता तयार करण्यात आला. आणखी चार दिवस हा कुर्ता रसिकांना पहाण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल इथे ठेवण्यात येणार आहे.

close