अयोध्या झाली बकाल

September 30, 2010 8:34 AM0 commentsViews: 1

आशिष जाधव, अयोध्या

30 सप्टेंबर

अयोध्येवर बरेच राजकारण झाले. मंदिर-मशिदीच्या राजकारणामुळे अयोध्येला बकालपण आले आहे. पण आता शांतता प्रस्थापित व्हायला हवी, असे अयोध्यावासीयांना वाटत आहे.

मंदिरांच्या या शहरात मशिदीही आहेत. पण त्याही मंदिरांप्रमाणेच भग्नावस्थेत, एकाकी पडलेल्या. इथले मुस्लीमही हिंदुप्रमाणेच. कोणीच कोणाला दोष देत नाही. पण सर्वांनाच अयोध्येच्या वादावर फार राजकारण झाल्याचे वाटते.

मंदिर-मशिदीच्या वादात सर्व काही वाहून गेल्याची येथील प्रत्येकाची भावना आहे. खरंच, अयोध्येतला वाद आणि त्याच्या राजकारणाची सर्वाधिक सर्वाची झळ कोणाला बसली असेल तर ती अयोध्यावासीयांना. त्यामुळेच सर्वांना आता शांतता हवी आहे. शांततेच्या मार्गाने तोडगा हवा आहे.

गेल्या 18 वर्षांमध्ये अयोध्येने खूप काही सोसले. आता येथील परिस्थिती पाहता काळाच्या मागे पडलेली अयोध्या न्यायालयाच्या निर्णयांनतर प्रगतीपथावर मार्गक्रमण करेल, अशी आशा आहे.

close