इतिहास अयोध्येतील वादाचा

September 30, 2010 9:39 AM0 commentsViews: 14

30 सप्टेंबर

1528 बाबरचा प्रशासक मीर बाकीने अयोध्येत मशीद बांधली आणि तिला बाबराचे नाव दिले

1858 बैरागी साधू मशिदीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी तक्रार मोहम्मद असगर या मशिदीच्या प्रमुखाने ब्रिटीश सरकारकडे केली

1885 मशिदीच्या आवारात पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशा मागणीची पहिली याचिका निर्मोही आखाड्याचे महंत रघुबर दास यांनी कोर्टात दाखल केली

1934 मशिदीच्या मालकीवरून दंगल उसळली

194922 डिसेंबरच्या रात्री मशिदीत रामाच्या मूर्ती सापडल्या. मशिदीच्या गेटला सरकारने टाळे ठोकले

1959पूजेची परवानगी मागण्यासाठी निर्मोही आखाडा आणि महंत रघुनाथ यांनी याचिका दाखल केली

1961सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने जागेवर दाव्यासाठी याचिका दाखल केली

1982विश्व हिंदू परिषदेने राममंदिर चळवळ सुरू केली

1986अयोध्येच्या जिल्हा न्यायाधीशांनी गेटचे दरवाजे उघडले. हिंदूंना पूजा करण्याची परवानगी

1989तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी नियोजित राममंदिरासाठी शिलान्यासाची परवानगी दिली

19926 डिसेंबर – बाबरी मशीद पाडली

1992कोर्टाने सुरुवातीला वादग्रस्त जागेच्या भोवतालची 2.77 एकर जमीन ताब्यात घेतली. नंतर एकूण 67.7 एकर जागा ताब्यात घेतली.

डिसेंबर 1992- जानेवारी 1993 – मशीद पडल्यानंतर दंगली उसळल्या

2002संघ परिवाराने आणखी एक शिलादान समारंभ केला

16 डिसेंबर 1992 – नरसिंह राव सरकारने बाबरी मशीद प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती एम. एस. लिबरहान आयोगाच्या नेमणुकीची घोषणा केली

1993 – लिबरहान आयोगाने तपास सुरू केला

1998 – केंद्रात वाजपेयींचे आघाडी सरकार सत्तेवर

2002 – वाजपेयी यांनी आपल्या ऑफीसमध्ये अयोध्या सेलची स्थापना केली. हिंदू आणि मुस्लीम नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी शत्रुघ्न सिंह यांची नेमणूक

फेब्रुवारी 2002 – उत्तर प्रदेश निवडणुकीच्या भाजपच्या जाहीरनाम्यात राममंदिर बांधण्याचा उल्लेख नाही

फेब्रुवारी-मार्च 2002 – अयोध्येहून पतरणार्‍या भाविकांच्या ट्रेनच्या डब्याला गुजरातच्या गोध्रामध्ये आग, 58 हजार जणांचा मृत्यू, त्यानंतर उसळलेल्या दंगलीत 1 हजार जणांचा मृत्यू

एप्रिल 2002 – अलाहाबाद हायकोर्टातल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे अयोध्या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात

जानेवारी 2003 – वादग्रस्त जागी राममंदिर होते का, हे तपासण्यासाठी पुरातत्व खात्याकडून उत्खनन

2003 – मशिदीच्या खाली मंदिरासारखे बांधकाम आहे, पुरातत्व खात्याचा अहवाल

सप्टेंबर 2003 – विश्व हिंदू परिषद आणि भाजपच्या सात नेत्यांना जबाबदार धरले. पण अडवाणी यांच्याविरोधात गुन्हा नाही

2004 – एनडीएचा पराभव, यूपीए सत्तेत

30 जून 2009 – तब्बल 16 वर्षांनंतर आणि 48 वेळा मुदतवाढ घेतल्यानंतर लिबरहान आयोगाचा अहवाल अखेर सादर

8 सप्टेंबर 2010 – अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाने निकालाची 24 सप्टेंबर ही तारीख घोषित केली

14 सप्टेंबर 2010 – निकाल पुढे ढकलण्यासाठी अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात याचिका दाखल

24 सप्टेंबर 2010 – सुप्रीम कोर्टाने अयोध्येच्या निकालाला स्थगिती दिली

28 सप्टेंबर 2010 – सुप्रीम कोर्टानं निकालावरची स्थगिती उठवली, निकालाची 30 सप्टेंबर ही तारीख जाहीर

close