नागपूरमधल्या कापूस उत्पादकांच्या दिवाळीवर संक्रांत

October 28, 2008 11:30 AM0 commentsViews: 65

28 ऑक्टोबर, नागपूरधनत्रयोदशीचा मुहूर्त साधून राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघानं कापूस खरेदीला प्रारंभ केला. पण, या खरेदीचा फायदा विदर्भातल्या शेतकर्‍यांना मात्र होताना दिसत नाही. नागपूरच्या आसपासच्या अनेक गावातून शेतकरी त्यांचा कापूस विकण्यासाठी बुटीबोरी संकलन केंद्रावर येत आहेत. पण, त्यांच्या कापसाचे पैसे एक महिन्यानंतर देण्याचा निर्णय कापूस फेडरेशननं घेतला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या दिवाळीच्या उत्साहावर मात्र विरजण पडलं आहे.' दिवाळीच्या तोंडावर सरकार हे सगळं करत आहे. यावरून असं दिसतं की सरकारला आमच्या परिस्थितीची जाणीव नाही. भाव बरोबर देत नाहीत, हातात पैसा नाही आणि मग कसली दिवाळी? ' , अशी संतप्त प्रतिक्रिया विलास सोमकुवर या शेतकर्‍याने दिली.दरम्यान निसर्गानं योग्य साथ दिली नाही, म्हणून शेतकर्‍यांना पैसे देण्यास विलंब होत असल्याचं स्पष्टीकरण कापूस पणन महासंघानं दिलं आहे.

close