गोदामाला आग लागून तांदूळ, तेल खाक

September 30, 2010 10:40 AM0 commentsViews: 1

30 सप्टेंबर

आज पहाटे चारच्या सुमारास कोरेगाव येथील शासकीय गोदामाला आग लागली. ही आग विझवण्यासाठी सातारा, वाई, कराड येथील सात फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

तब्बल चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात फायर ब्रिगेडला यश आले. आगीत गोदामातील 1380 क्विंटल तांदूळ, 51 हजार लीटर पामतेल आणि 700 टन शालेय पोषण आहारातील तांदूळ जळून खाक झाला.

गोदामा जवळच्याच रजिस्टर रुमला आग लागली नसतानाही तेथिल रेकॉर्डचे रजिस्टर मात्र जळलेल्या अवस्थेत सापडली.

close