मुसळधार पावसाचे पुण्यात 4 बळी

September 30, 2010 1:30 PM0 commentsViews: 2

30 सप्टेंबर

पुण्यात काल रात्री 10 ते 12 या दोन तासांत झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला.पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली.

कोथरूड भागात पाण्याच्या लोंढ्यामुळे संरक्षक भिंत फुटून कन्स्ट्रक्शन साईटजवळ राहणार्‍या मजुरांच्या झोपड्या वाहून गेल्या.

त्यात नवरा बायकोसह त्यांची 2 लहान मुले असा एकूण 4 जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे सिंहगड रोडवर वडगाव बुद्रुक येथे पाण्यात विद्युतप्रवाह उतरल्याने शॉक बसून एका तरूणाचा मृत्यू झाला.

शहराच्या विविध भागात सोसायट्या आणि झोपड्यांमधे पाणी शिरल्याच्याही अनेक घटना घडल्या. वारजे पुलाखालचा रस्ता वाहून गेला.

या रस्त्याला ओढ्याचे स्वरूप येऊन वाहने वाहून गेली. अनेक चारचाकी गाड्यांचे यात प्रचंड नुकसान झाले.

close