हॉस्पिटलमध्ये नरकयातना…

October 1, 2010 10:32 AM0 commentsViews: 6

1 ऑक्टोबर

गरिबांचे हॉस्पिटल म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटलमध्ये पेशंटना प्रचंड गैरसोयी सहन कराव्या लागत आहेत.

हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा स्टाफ असतानाही पेशंटना अक्षरश: नरकयातना भोगाव्या लागत आहेत.

येथील बेवारस पेशंटची अवस्था तर मानवतेला काळीमा फासणारी आहे. हॉस्पिटलमध्ये हा वॉर्ड आहे, हेच येथील डॉक्टर विसरून गेले आहेत.

एकही डॉक्टर किंवा नर्स इथे फिरकत नाही. पेशंटची अवस्था इतकी वाईट आहे, की त्यांच्या अंगावर एकही कपडा नाही. आणि बेडवर पडून राहिल्याने त्यांना अंगभर बेड सोअर्स झालेले आहेत.

हॉस्पिटल झाले जागे

आता ह्या बातमीची दखल घेण्यात आली आहे. या बातमीनंतर छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल खडबडून जागे झाले आहे. त्यांनी पेशंटवर उपचार सुरु केले आहेत. तसेच संबंधित जबाबदार डॉक्टरांना खुलासा देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

या खुलाशानंतर चौकशी समिती गठीत करण्यात येणार असून त्यानंतर दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे हॉस्पिटलचे डीन डॉ. मधुकर परचंड यांनी सांगितले आहे.

close