क्विन्स बॅटन रिले दिल्लीत दाखल

October 1, 2010 10:51 AM0 commentsViews:

1 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ गेम्सची क्वीन्स बॅटन रिले काल दिल्लीत दाखल झाली. या बॅटनने भारताच्या 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशामधून जवळजवळ 20 हजार किलोमीटरचे अंतर पार केले.

गुडगावला बॅटन आल्यानंतर खासदार रघुबीर सिंग काडियन यांनी ही बॅटन उपायुक्त राजेंद्र कटारिया यांच्याकडे सुपूर्द केली.

आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी ही बॅटन नायब राज्यपाल तेजेंदर खन्ना यांच्याकडे देतील आणि यानंतर तेजेंदर ती दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याकडे सुपूर्द करतील.

रिलेचा 71 देश आणि 1.9 लाख किलोमीटरचा प्रवास 3 ऑक्टोबरला जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर येऊन संपेल.

close