कॉमनवेल्थसाठी दिल्लीकर सज्ज

October 1, 2010 11:03 AM0 commentsViews: 2

सोनल जोशी, नवी दिल्ली

1 ऑक्टोबर

कॉमनवेल्थ स्पर्धेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचे आयोजन समितीकडून सांगितले जात आहे. पण दिल्लीकर आधीपासूनच या स्पर्धेची जोरदार तयारी करत होते.

भारतामध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धा यशस्वी व्हाव्यात, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

अखेर कॉमनवेल्थ गेम्सवरचे चिंतेचे सावट बर्‍याच प्रमाणात दूर झाले. आणि आता दिल्ली ही मोठी स्पर्धा भरवण्यासाठी सज्ज झाली आहे.

गेल्या आठवड्यात स्पर्धेला वाचवण्याची धडपड सुरू होती. केंद्र सरकार आणि पंतप्रधान यांच्या हस्तक्षेपानंतर स्पर्धेचे आयोजन यशस्वी होईल अशी आशा सगळ्याना वाटत होती.

अखेर गेम व्हिलेजची सुरक्षाही आपापल्या जागी असलेली दिसली. आणि या व्हिलेजमध्ये ऍथलेट्स यायला लागल्यामुळे दिल्लीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत असल्याचा माहोलही अखेर तयार झाला.

अख्ख्या जगाचे लक्ष दिल्लीकडे लागले असताना ही स्पर्धा यशस्वी करण्याचे आव्हान दिल्लीकरांवर असणार आहे.

मंगळवारी जवाहरलाल नेहरू स्टेडियमसमोरचा पूल कोसळला होता. आता आर्मीने हा पूल पूर्णही केला आहे.

त्याचबरोबर दिल्लीच्या रस्त्यांवरची स्वच्छताही जोरात सुरू आहे. प्रत्येक दिल्लीकरही कॉमनवेल्थ स्पर्धेसाठीही तयार झाल्याचे दिसत आहे. ट्राफिकचे सगळे नियम पाळले जात आहेत.

पार्किंगमध्ये कॉमनवेल्थच्या गाड्यांसाठी राखून ठेवलेली जागेत इतर गाड्या पार्क होताना दिसत नाहीत.

दिल्लीच्या रस्त्यांवरही या स्पर्धेच्या आयोजनाचा अभिमान दिसत आहे.

सगळ्यांचे जणू आता एकच लक्ष्य आहे, ते म्हणजे गेम्स यशस्वी करणे.

close