कोल्हापुरात काँग्रेस स्वतंत्रपणे रिंगणात

October 1, 2010 11:18 AM0 commentsViews: 17

प्रताप नाईक, कोल्हापूर

1 ऑक्टोबर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात काँग्रेस स्वतंत्रपणे उतरली आहे. पण पक्षांतर्गत गटबाजीमुळे पक्षातच फूट पडलेली दिसत आहे.

निवडणूक आता फक्त काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही आमदार महादेवराव महाडीक आणि सतेज पाटील यांच्यातील दरी कमी होताना दिसत नाही. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील आमदार महादेवराव महाडीक आणि सतेज पाटील या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे.

आमदार सतेज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत ज्या उमेदवाराने पक्षाचे प्रामाणिक काम केले, त्याच उमेदवाराला तिकीट मिळावे, अशी मागणी केली आहे.

त्याचसोबत आमदार महादेवराव महाडीक यांनी आपल्या पुतण्याला विरोधात उतरवून पक्षाच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

तर दुसरीकडे ताराराणी आघाडी ही काँग्रेसचीच आहे. त्यामुळे त्याला वेगळे लेखू नये, असे ताराराणी आघाडीचे नेते धनंजय महाडीक यांनी म्हटले आहे.

आमदार सतेज पाटील आणि ताराराणी आघाडीचे नेत्याँमधील मतभेद टोकाला गेल्याए पक्षाचे नुकसान होईल, असे सामान्य कार्यकर्त्याला वाटत आहे.

पण पक्षाचा आदेश असेल तर ताराराणी आघाडीच्या नेत्यांना आपल्याबरोबर घेऊन जावे लागेल, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन.पाटील यांचे मत आहे.

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी तोडगा काढला असला तरी तो दोन्ही नेत्यांना तो मान्य नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाला विरोधकापेक्षा पक्षाअंर्गत संघर्षालाच जास्त तोंड द्यावे लागत आहे. यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र अस्वस्थ झाला आहे.

close