रोबो जगभरात रिलीज

October 1, 2010 11:36 AM0 commentsViews: 5

1 ऑक्टोबर

सुपरस्टार रजनीकांत आणि ऐश्वर्या राय यांचा रोबो हा सिनेमा आज जगभरात रिलीज झाला आहे. साऊथमध्ये हा सिनेमा एंधिरन या नावानं रिलीज झाला आहे.

बहुचर्चित शिवाजी या सिनेमानंतर रजनीकांत याचा हा चर्चित सिनेमा असल्याने, त्याच्या चाहत्यांमध्ये भरपूर उत्सुकता आहे.

शिवाय बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री ऐश्वर्या राय पहिल्यांदाच या सिनेमातून रजनीकांतसोबत काम करत आहे.

तब्बल 200 कोटींचे बजेट असणार्‍या या सिनेमाच्या 2000 प्रिंटस् जगभरात रिलीज झाल्या आहेत.

close