पुण्यातील सराफांचा बंद

October 1, 2010 11:52 AM0 commentsViews: 2

1 ऑक्टोबर

पुणे सराफांच्या जकातीचे प्रकरण चिघळले आहे. उद्या पुण्यातील सराफांनी जकातीच्या दंडाविरोधात बंद पुकारला आहे. पुणे सराफ असोसिएशनने याबाबत घोषणा केली आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीने सराफांनी 35 कोटींची जकात चुकवल्याचा ठपका ठेवला आहे. गेल्या 10 वर्षांत ही 35 कोटींची जकात चुकवल्याचे स्थायी समितीने म्हटले आहे.

दहा पट दंड या हिशोबाने आता त्यांच्याकडून दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे सराफांना 350 कोटी दंड भारावा लागणार आहे.

या दंडोविरोधातच सराफांनी बंद पुकारला आहे.

close