पाँटींग आणि झहीरमध्ये पुन्हा बाचाबाची

October 1, 2010 12:02 PM0 commentsViews:

1 ऑक्टोबर

मोहालीत सुरू असलेल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला.

कॅप्टन रिकी पाँटींग आणि झहीर खान यांच्यामध्ये पुन्हा एकदा बाचाबाची झाली.पाँटींग 71 रन्सवर आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनच्या बाजूने चालत होता.

त्यावेळी झहीर खान पाँटींग काहीतरी बोलला. त्यामुळे पाँटींग पुन्हा मैदानात परतला.

आणि तो आनंद साजरा करत असलेल्या भारतीय टीमच्या जवळ जाऊन काहीतरी बोलला.

एवढेच नव्हे तर त्याने झहीरसमोर बॅटही उगारली. अंपायर बिली बाऊडन यांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि पाँटींगला परत पाठवले.

close