ऑस्ट्रेलियाने ओलांडला 200चा टप्पा

October 1, 2010 11:13 AM0 commentsViews: 1

1 ऑक्टोबर

मोहाली टेस्टमध्ये आज ऑस्ट्रेलियाने पहिली बॅटिंग करताना दोनशे रन्सचा टप्पा ओलांडला. पण त्यांनी पाच विकेटही गमावल्या.

ओपनर शेन वॉटसनची शानदार इनिंग आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. टेस्टमधील दुसरी सेंच्युरी आज त्याने झळकावली.

टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतल्यावर झहीर खानने सायमन कॅटिचला सहा रनवर आऊट करुन ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला.

पण पाँटिंग आणि वॉटसनने सेंच्युरी पार्टनरशिप करत टीमला चांगली सुरुवात करुन दिली. पाँटिंग 71 रनवर रनऊट झाला.

त्यानंतर मायकल क्लार्क , नॉर्थ आणि हसीही लवकर आऊट झाले. पण दुसर्‍या बाजूने शेन वॉटसनने शानदार बॅटिंग सुरु ठेवली आहे. भारतातर्फे झहीरने तीन तर हरभजनने एक विकेट घेतली.

close