ईद पार्टीची राष्ट्रवादीकडून दखल

October 1, 2010 2:30 PM0 commentsViews: 2

1 ऑक्टोबर

गृहमंत्री आर. आर. पाटील गुन्हेगारांसोबत दिसल्याची बातमी 'आयबीएन-लोकमत'ने दाखवल्यानंतर एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष नसीम सिद्दिकी यांच्याकडे पक्षाने स्पष्टीकरण मागितले आहे.

सिद्दिकी यांनी ईदच्या दिवशी त्यांच्या घरात पार्टी आयोजित केली होती. त्यावेळी सलीम पटेल, मोबीन कुरेशी आणि इरफान कुरेशी या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींसोबत आर. आर. पाटलांची भेट झाली होती.

दरम्यान आर. आर. पाटील यांची यात काहीच चूक नाही, नसीमन सिद्दिकी यांनीच काळजी घ्यायला हवी होती, असे जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.घडलेल्या प्रकाराबद्दल अजित पवार यांनी पोलिसांनाही फटकारले आहे.

तर सिद्दिकी यांनी मात्र आता सलीम पटेलला आपण ओळखतच नाही, असा दावा केला आहे.

close