डोंबविलीत मनसेच्या मुलाखती सुरू

October 1, 2010 5:26 PM0 commentsViews: 2

1 ऑक्टोबर

कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीसाठी आता सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. मनसेच्या 64 ते 107 या वॉर्डातील उच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत.

मनसेचे आमदार नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे आणि शिरीष सावंत यांच्यासोबत इतर सहा जण या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत.

दोन दिवसांपूर्वी कल्याण भागातील मुलाखती आल्या. या निवडणुकीसाठी राज ठाकरे स्वत: डोंबिवलीत तळ ठोकून राहणार आहेत.

close