अनधिकृत घरांवरील कारवाई लांबणीवर

October 1, 2010 5:29 PM0 commentsViews: 7

1 ऑक्टोबर

ठाणे जिल्ह्यातील पाच लाख अनधिकृत घरांवरची कारवाई चार दिवस लांबणीवर पडली आहे. आता येत्या सोमवारपासून ही कारवाई केली जाणार आहे.

1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सर्व अनधिकृत बांधकामे तोडावीत, असा आदेश हायकोर्टाने दिला होता. पण अयोध्या वादाच्या निर्णयामुळे जिल्हाभरात पोलीस बंदोबस्त अनिश्चित काळापर्यंत तैनात करण्यात आला आहे. आणि या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई पुढे ढकलली गेली आहे.

महानगरपालिका, सिडको, एमआयडीसी आणि ठाणे जिल्हाधिकारी विभागाने ही माहिती दिली.

close