भिवंडीतही धान्य सडतेय

October 2, 2010 10:09 AM0 commentsViews: 8

2 ऑक्टोबर

भिवंडीच्या सरकारी गोदामांमध्ये कित्येक क्विंटल धान्य जागा नसल्याने उघड्यावरच ठेवण्यात आले आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर या परिसरात हे रेशनिंगचे धान्य पुरवले जात आहे.

एफसीआयच्या गोदामाच्या बाहेर तब्बल 5 हजार मेट्रीक टन धान्य उघड्यावर ठेवण्यात आले आहे. भिवंडीतील एफसीआयच्या अंजूर फाटा इथे असलेल्या गोदामात हे अतिरिक्त धान्य केवळ प्लॅस्टिकने झाकून उघड्यावर ठेवण्यात आले आहे.

येथील गोदामाच्या भिंती ठिकठिकाणी पडल्या आहेत. त्यातून पाणी झिरपल्याने आतील धान्य सडले आहे. तीच अवस्था बाहेरच्या धान्याची आहे. या गोदामाच्या संरक्षण भींतीही तुटलेल्या असल्याने येथील धान्य चोरीस जाण्याचीही शक्यता आहे.

30 एकरांवर पसरलेले हे गोदाम कमी पडत असल्याने भिवंडीतील दापोडा आणि कारवार इथे गोदामे भाड्याने घेण्यात आली आहेत. पण तेथील गोदामातील धान्यही याच अवस्थेत आहे.

गोदामातील हे धान्य वेळेवर दुकानांपर्यंत पुरवले जात नसल्याने धान्याची ही अवस्था झाली आहे.

close