सातारा रोडवर टोलविरोधी आंदोलन

October 2, 2010 10:19 AM0 commentsViews: 4

2 ऑक्टोबर

पुणे सातारा रोडवरील खेड शिवापूर आणि आणेवाडी टोलनाक्यावर आज मोठे आंदोलन करण्यात आले. टोल दरवाढीच्या निषेधार्थ टोल न भरण्याचा इशारा मालवाहतूकदार संघटनेने दिला आहे.

नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियाने देहूरोड ते सातारा रस्ता 6 पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामापोटी वाढीव टोलवसुली करण्यात येणार आहे.

पुणे सातारा रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून कात्रज तसेच खंबाटकी बोगद्यात दिवे नाहीत. त्यामुळे टोल भरणार नाही, अशी भूमिका घेत मनसे, शिवसेनेसहित इतर राजकीय पक्षांच्या वाहतूकदार संघटनेने जोरदार आंदोलन केले.

close